क्षमता बांधणी
‘गरीबांना गरीबीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा असते’. पंरतु त्यासाठी त्यांना पोषक वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक आहे. हे सुत्र लक्षात घेऊन अपर्णा बहुद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे.
संस्थे अंतर्गत ग्रामीण व शहरी महाराष्ट्रातील गरीब व जोखीम प्रवण कुटुंबांना समृध्द, आत्मसन्मानाने व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या सर्वसावेशक, लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करुन त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा, तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी उमेद मार्फ़त प्रयत्न करण्यात येत आहेत. या मध्ये गावांमध्ये गरीब महिलांचे स्वयं सहाय्यता गट, स्वयं सहाय्यता गटांचे ग्रामपंचायत स्तरावर ग्राम संघ व जिल्हा परिषद स्तरावर प्रभाग संघांची तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक गटांची निर्मिती करण्यात येत आहे. या गरीबांच्या संस्थांना दैंनदिन सुलभिकरणासाठी गावास्तरावर प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्तींची फ़ळी निर्माण करण्यात आलेली आहे.
क्षमता बांधणीचे उद्देश
• ग्रामीण भागातील संस्थेत सहभागी महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम करणे.
• कौटुंबिक व समुदाय स्तरीय निर्णय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात महिलांचा प्रभावी सहभाग वाढविणे.
• गरीबांच्या समुदायस्तरीय सर्वसावेशक, लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलित संस्थांची निर्मिती करुन त्या संस्था सक्षम करण्यासाठी संस्था व्यवस्थापनाचे कौशल्य विकसित करणे.
• महिला व संस्थामध्ये आर्थिक साक्षरता वाढविणे आणि आर्थिक व्यवस्थापनाचे कौशल्य विकसित करणे.
• शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे व उपजीविकेतील संभाव्य धोके टाळण्यासाठी रणनिती आखण्याचे कौशल्य विकसित करणे.
• संवाद, नेतृत्व, लेखाव्यवस्थापन, समन्वय इत्यादी कौशल्य विकसित करणे.
मॉडयूलची माहिती
मॉड्यूल कोड | मॉड्यूलची माहिती |
SM1 | स्वयंसहाय्यता गटाचे मुलभुत प्रशिक्षण |
SM1 फिल्पचार्ट | स्वयंसहाय्यता गटाचे मुलभुत प्रशिक्षण |
SBKM1 | स्वयंसहाय्यता गटाच्या हिशोबनिसाचे मुलभुत प्रशिक्षण |
SM2 | आर्थिक साक्षरता आणि फिरता निधी |
VM1 | ग्रामसंघ सदस्यांसाठी मुलभुत प्रशिक्षण |
VBKM1 | ग्रामसंघ लिपिकेसाठी मुलभुत प्रशिक्षण |
ग्रामसंघ उपसमिती प्रशिक्षण | ग्रामसंघाच्या उपसमितीचे प्रशिक्षण |
VM2 | ग्रामसंघाच्या पुढील ५ वर्षाचे नियोजनाची तयारी |
ग्रामसंघ व प्रभागसंघ पोस्टर सेट | ग्रामसंघ व प्रभागसंघ रचना |
CLFM 1 | प्रभागसंघ सदस्यांसाठी मुलभुत प्रशिक्षण |
VO Monitoring Sub Committee | ग्रामसंघातील सर्व व्यवहारांचे व निर्णय प्रक्रियेचे सनियंत्रण करने |
Bank Linkage Committee | MIP मध्ये दिलेल्या नियोजननानुसार उत्पन्न, उद्योग साधने व मालमत्ता पाठपुरावा |
Social Action Committee | सामाजिक मुद्दे, समस्या विषयी सदस्यांमध्ये जाणीव जागृती, संवेदनशीलता निर्माण करणे |
CrM1 | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्तीचे मूलभूत प्रशिक्षण |
CTC | समुदायस्तरीय प्रशिक्षकांचे मूलभूत प्रशिक्षण |
PIP CRP | निवड करण्यात आलेल्या PIP CIP यांचे प्रशिक्षण |
गाव पातळीवर PIP प्रक्रिया |